65 crore property of Income Tax Department officer seized by ED mumbai esakal
मुंबई

Mumbai Crime News : 65 कोटीची आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची मालमत्ता ईडीकडून जप्त

कर फसवणूक करून मनी लॉड्रिंग प्रकरणी आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याची ईडीने 65 कोटीची मालमत्ता शुक्रवारी जप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर फसवणूक करून मनी लॉड्रिंग प्रकरणी आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याची ईडीने 65 कोटीची मालमत्ता शुक्रवारी जप्त केली आहे. तानाजी मंडल अधिकारी असे आरोपी आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे.

खंडाळा, लोणावळा ,कर्जत आणि कर्नाटकातील इतर काही ठिकाणी, एकूण 69.65 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जमीन मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या कथितपणे फसवणूकी प्रकरणी ईडीने शुक्रवारी कारवाई केली. वरिष्ठ अधिकारी तानाजी मंडल अधिकारी आणि इतरांनी कथितरित्या आयकर विभागाची एकूण 263 कोटी रुपयांचा कर फसवणूक केल्याचा आरोप आहे.

लोणावळा, खंडाळा, कर्जत आणि उडुपी (कर्नाटक) येथील जमीन, पनवेल आणि मुंबई येथे फ्लॅट तसेच तीन आलिशान कार ईडीने जप्त केलेली आहे . या एकूण 32 मालमत्ता आरोपींनी त्यांच्या नावे आणि इतर संबंधित व्यक्तींच्या नावे गुन्ह्यातून मिळवलेल्या आर्थिक उत्पन्नतून मिळवल्या असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. ही मालमत्ता 69 कोटी रुपयांची आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) च्या अतिरिक्त महासंचालक (दक्षता) यांच्या लेखी तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून सीबीआयने गुन्हा दाखल केला. दाखल केलेल्या गुन्ह्यात मनी लाँड्रिंग झाल्याचे समोर आले नंतर हे प्रकरण ईडीने तपास करायला घेतले आहे . या प्रकरणात ईडीने यापूर्वी 96.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती. ताज्या कारवाईमुळे, या प्रकरणातील एकूण संलग्नता आता सुमारे 166 कोटी रुपये झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note Update: RBI कडून 2 अब्ज प्लॅस्टिकच्या नोटा लवकरच चलनात! केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती; कागदी नोटा बंद होणार?

सलग ५ निर्धाव षटकं अन् ५ विकेट्स; Justin Greaves इतिहास घडवला, पाकिस्तानने गुडघे टेकले; ७ फलंदाज ३८ धावांत तंबूत Video

Latest Live Updates Marathi : गोदावरीची पूर परिस्थिती सलग आठव्या दिवशी कायम

Commonwealth Games: कारगिल योद्ध्यांना विजय समर्पित... पाकिस्तानी बॉक्सरचा धुव्वा उडविल्यानंतर भारताच्या जादुमानीची भावना

Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT