मुंबई

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मध्य रेल्वे मार्गावर 68 अतिरिक्त लोकल फेर्‍या धावणार

प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या लोकल मध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोविड 19 च्या नियमांचा भंग होऊन, प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 355 फेऱ्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावत होत्या, त्यामध्ये आता 68 फेऱ्यांची वाढ झाली असून, आता 423 फेऱ्या मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे.

नुकतेच  1 सप्टेंबरपासून खासगी कार्यालय कर्मचार्‍यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरुन 30 टक्के झाली, तर सरकारी कर्मचार्‍यांचीही उपस्थिती 20 टक्यांवरुन 30 टक्के करण्यात आली. तसेच  राज्य सरकारच्या विनंतीवरून सर्व सहकारी आणि खासगी बँकांच्या कर्मचार्‍यांना लोकल सेवेत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि बेस्ट बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा ही भंग होताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल मध्ये अनेक विभागातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता, मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरु नयेत, तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर नियम पाळण्यासाठी तब्बल 68 लोकल फेर्‍या वाढविण्यात आल्या आहे. मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला एकूण 423 लोकल फेर्‍या धावणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
 
अधिक वाचाः  प्लाझ्माची कमाल किंमत निश्चित, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

अशा धावतील अतिरिक्त 68 लोकल फेर्‍या

  • मार्गे - एकूण फेऱ्या
  • कसारा - सीएसएमटी  9 फेर्‍या 
  • कसारा - कल्याण-सीएसएमटी  6  फेर्‍या
  • कर्जत - सीएसएमटी 9 फेर्‍या
  • ठाणे-कर्जत-सीएसएमटी 2 फेर्‍या
  • कल्याण-कर्जत-सीएसएमटी 2 फेर्‍या
  • अंबरनाथ-सीएसएमटी 3 फेर्‍या 
  • कल्याण-सीएसएमटी 5 लोकल फेर्‍या
  • ठाणे - सीएसएमटी 4 फेर्‍या
  • कुर्ला- सीएसएमटी 6 फेर्‍या
  • पनवेल- सीएसएमटी 14 फेर्‍या 
  • वाशी- सीएसएमटी 8 फेर्‍या

----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

68 additional local ferries will run on the Central Railway line

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT