7 accused arrested in Malad robbery case mumbai crime police sakal
मुंबई

Mumbai Crime : मालाडमध्ये 75 लाखाची लूट प्रकरणी 7 आरोपी अटकेत

मालाड येथील एका विदेशी मुद्रा व्यापाऱ्याच्या कंपनीत कार्यरत दोन कर्मचाऱ्यांकडून चाकूच्या धाकावर 75 लाख रुपये लुटण्यात आले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मालाड येथील एका विदेशी मुद्रा व्यापाऱ्याच्या कंपनीत कार्यरत दोन कर्मचाऱ्यांकडून चाकूच्या धाकावर 75 लाख रुपये लुटण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.

लुटलेली 15 लाखांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यात वापरलेले दोन दुचाकी आणि एक शस्त्रही जप्त केले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा मालाड पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी रात्री मालाडस्थित फॉरेक्स एक्सचेंज कंपनीत कार्यरत प्रतीक भोजने आणि गणेश तळवटकर याना चाकुच्या धाकावर लुटण्यात आले. हे दोन कर्मचारी दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये ठेवलेले 50 लाख आणि 25 लाख रुपये त्यांच्या मार्वे रोड स्थित त्यांच्या मालकाच्या घरी घेऊन जात होते.

बॅग घेऊन दोघे पटेल यांच्या इमारतीत पोहोचले असता तिथे दुचाकीवरून 3 अज्ञात तेथे आले. त्यातील दोघे खाली उतरले आणि एकाने चाकू काढून भोजने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दरोडेखोराने तळवटकर यांना धक्काबुक्की केली. नंतर, त्यांनी दोन्ही बॅग हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला.

भोजने यांनी तात्काळ त्यांच्या मालकाला फोन करून घटनेची माहिती दिली. फॉरेक्स एक्सचेंज कंपनीने मालाड पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा, पुणे, नाशिक, रायगड, जालना आणि मुंबई येथून 7 आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या अन्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT