कल्याण लोकसभा मतदारसंघात 7 लाखाची रोख रक्कम जप्त SAkal
मुंबई

Dombivli News : कल्याण लोकसभा मतदारसंघात 7 लाखाची रोख रक्कम जप्त ; एसएसटी पथकाची कारवाई

कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी ब्रीजवरील टिकीट कांऊटरजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या एसएसटी पथकाने मंगळवारी 7 लाखाची संशयास्पद रोख रक्कम जप्त केली आहे. कल्याण पूर्वेत नागरिकांच्या तपासणी दरम्यान ही रक्कम आढळून आली आहे.

कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी ब्रीजवरील टिकीट कांऊटरजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत होते. यावेळी कोळसेवाडी येथे राहणारे जयेश पोटे यांचेकडे असलेल्या बॅगेबाबत तपासणी केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी सविस्तर उत्तर दिले नाही.

तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये 7 लाख पंचनामा करून, जप्त करुन कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन, कल्याण (पश्चिम) येथे पोलीस ठाण्याच्या पितळी सीलने पेटीमध्ये स्वाक्षरी करुन सीलबंद केले. अशी माहिती 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे एसएसटी पथकाचे स्थिर सर्व्हेक्षण पथक पथकप्रमुख दिपेश राठोड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT