मुंबई

मुंबईतील ७० सराफ जीएसटी विभागाच्या रडारवर

अनिश पाटील

मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) चुकवण्यासाठी हवाई मार्गाने सोने, हिरे, दागिन्यांची बेकायदा देशांतर्गत वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. असा तब्बल २६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जीएसटी विभागाने जप्त केला असून, मुंबईतील ७० सराफ रडारवर आले आहेत. त्यापैकी बहुतेक सराफ झवेरी बाजार येथील असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

हैदराबाद, कोलकाता, दिल्ली व चेन्नई येथील काही सराफ जीएसटी चुकवण्यासाठी सोन्याच्या लगडी व दागिने, हिरे अशा मौल्यवान वस्तूंची बेकायदा हवाई वाहतूक करत असल्याची माहिती जीएसटी विभागाला मिळाली होती. त्यासाठी कुरिअर कंपन्यांचा वापर केला जात होता. त्यानुसार जीएसटी विभागाच्या पथकाने ७ जानेवारीला सांताक्रूझ येथील विमानतळावरील कुरिअर कंपन्यांच्या कार्यालयांवर छापा टाकून सात पार्सले ताब्यात घेतली. या पार्सलची पडताळणी १५ ते १७ जानेवारीदरम्यान केली असता, संबंधितांनी चुकीची माहिती देऊन जीएसटी चुकवल्याचे उघड झाले.

या प्रकरणाचा तपास प्राथमिक स्तरावर असल्यामुळे त्यांची नावे जाहीर करणे शक्‍य नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. जप्त केलेला मुद्देमाल सुमारे २६ कोटी रुपयांचा असून, लवकरच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल,  अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT