वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने अंधारात बुडालेली चेंबूरची सिद्धार्थ कॉलनी.
वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने अंधारात बुडालेली चेंबूरची सिद्धार्थ कॉलनी. 
मुंबई

७७ कोटींची बिले थकली; ‘अदानी’ने कापली वीज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतल्या रहिवाशांचे गेल्या १४ वर्षांत तब्बल ७७ कोटींचे वीज बिल थकल्याने अदानी कंपनीने बुधवारी त्यांचा वीजपुरवठा बंद केला. कंपनीने बिल भरण्यासाठी रहिवाशांना तीन महिन्यांची मुदत दिली होती; परंतु वर्षभरानंतरही ते भरले न गेल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा कंपनीतर्फे बंद करण्यात आला. 

मुंबईतील बहुसंख्य आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सिद्धार्थ कॉलनीत ३,५०० पेक्षा अधिक घरे आहेत. कॉलनीच्या विकासासाठी २००५ पासून आतापर्यंत तीन ते चार विकासक आणण्यात आले. त्यांनी विकासापूर्वी वीज बिल भरू, असे आश्‍वासन रहिवाशांना वेळोवेळी दिले; परंतु ते प्रत्यक्षात आलेच नाही. विकासकांनी आतापर्यंत वीज बिल ना स्वतः भरले ना रहिवाशांना भरावयास लावले. त्याचा परिणाम म्हणजे अदानी वीज कंपनीचे १४ वर्षांत एकूण ७७ कोटींचे बिल थकले. बिल भरण्यासंबंधी अदानी वीज कंपनीला वर्षभर फक्त तारखा देण्यात आल्या. शेवटी एक वर्ष वाट पाहून कंपनीने वीजपुरवठा बंद केल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. 

याआधीही वीज कंपनीकडून अनेकदा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी कॉलनीतील काही कार्यकर्ते व विकासकांनी राजकीय नेत्यांमार्फत अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बिलासंदर्भात मध्यस्थी केली. त्यातून त्यांनी बिल भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागून घेतली; परंतु त्यानंतरही विकासक वा अन्य कोणीही वीज बिल भरले नाही.

सिद्धार्थ कॉलनीत काही रहिवासी रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करून राहतात. त्यांचे आजपर्यंत वीज बिल तीन ते पाच लाख आले आहे. विकासकांनी आश्‍वासन देऊनही वीज बिल भरले नाही. मग त्याची शिक्षा आम्हाला का, असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. 

सिद्धार्थ कॉलनीतील ज्या विकासकांनी अदानी कंपनीला वीज बिल भरू, असे सांगितले वा ज्या कोणी वीज बिल भरण्याबाबतचे हमी पत्र कंपनीला लिहून दिले, त्यांना अदानी वीज कंपनीने जबाबदार धरावे आणि त्यांच्याकडूनच वीज बिल वसूल करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

सिद्धार्थ कॉलनीतील घरधारकांचे एकूण ७७ कोटींचे वीज बिल थकले आहे. विकासक व काही कार्यकर्त्यांनी वीज बिलाचा भरणा करण्याकरिता तीन महिन्यांची मुदत मागून घेतली. कंपनीने एक वर्ष वाट पाहिली. तरीही वीज बिलाचा भरणा न झाल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला.
- विजेंद्र भावसार, जनसंपर्क अधिकारी, अदानी इलेक्‍ट्रिसिटी मुंबई लि.

विकासकांची नियुक्ती स्थानिक रहिवाशांनी केलेली नाही. कोणताही करार झालेला नसताना विकासक बिल कसे भरतो? घरधारकांना अंधारात ठेवून काम सुरू आहे. वीज बिलासंदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहे. चालू महिन्याचे वीज बिल भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. थकीत वीज बिल माफ करावे म्हणून आम्ही लढणार आहोत. 
- राजू घेगडमल, स्थानिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT