crime
crime Sakal
मुंबई

उल्हासनगरात आईसमक्ष 8 वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - आई तिच्या लहान मुलीसोबत स्कुटी वरून घरी जात होती.तेंव्हा मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला धडक दिल्याने आईसमक्ष तिच्या 8 वर्षीय मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

काल रात्री आचल भुपेश नारवानी ह्या त्यांची 8 वर्षीय मुलगी हिच्यासोबत शांतीनगर मार्गे कल्याण अंबरनाथ महामार्गावरून स्कुटी वरून घरी जात होत्या.आचल यादव डेअरी फार्म जवळ आल्या असता मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला धडक दिल्याने जखमी झालेल्या आचल बाजूला पडल्या.त्यांची 8 वर्षीय मुलगी सायरा ही रोडवर पडल्याने तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा तिच्या आईसमक्ष जागीच चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी भुपेश नारवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनिष वाघमारे यांनी ट्रक चालक विशाल यादव याला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT