ulhasnagar
ulhasnagar 
मुंबई

उल्हासनगरात मोठ्या नाल्यांची 80 टक्के सफाई

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगरात 46 मोठे नाले असून त्यांची 80 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. त्यासाठी 4 पोकलेन,6 डंपर,2 जेसीबी आणि 350 कंत्राटी कामगार जुंपण्यात आले आहेत.2005 मध्ये उदभवलेली पुरपरिस्थिती टाळण्यासाठी वसाहतींच्या मधोमध असलेल्या नाल्यांना स्वच्छ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर देशमुख यांनी ही माहिती दिली.

शहरातील नालेसफाईचा कंत्राट अनुभवी शशांक मिश्रा यांच्या शुभम कंट्रक्शनला देण्यात आलेला आहे.वालधुनी नदी शेजारील मिनाताई ठाकरे नगर, खन्ना कंपाऊंड, वडोल गाव,रमाबाई आंबेडकर नगर, उल्हासनगर रेल्वे स्टेशन,हिराघाट तसेच शहराच्या मधून जुन्या टेलीफोन एक्सचेंज,सिब्लॉक जवळून वाहणारा व शहाड च्या दिशेला जाणाऱ्या मोठ्या नाल्यांची सफाई जवळपास पूर्ण होत आली आहे. त्यासाठी मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार हे कंत्राटदार शशांक मिश्रा करत असलेल्या नालेसफाईच्या कामावर वॉच ठेवून असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, गल्लोगल्ली असणाऱ्या लहान नाल्या अनगिनत असून त्यात विशेषताः प्लास्टिकच्या पिशव्यांचा थर साचलेला असल्याच्या तक्रारी फोटो सह मासमीडियावर फिरू लागल्या आहेत.350 कामगरांना सोबत घेऊन लहान नाल्या पूर्णतः स्वच्छ करण्याच्या सूचना मुकादमांना देण्यात आल्या आल्या आहेत.येत्या पाच दिवसात मोठे व लहान नाले कचरा-प्लास्टिक व गाळ मुक्त करण्यात येणार असे विनोद केणे, शशांक मिश्रा यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT