मुंबई- अग्निवीरचे प्रशिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईमध्ये एका हॉस्टेलमध्ये महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.महिला केरळची रहिवाशी असून नेव्हीचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती दोन आठवड्यापूर्वी मुंबईमध्ये आली होती. (A 20 year old woman training to be an Agniveer died at her hostel room in Mumbai)
सोमवारी सकाळी महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये भांडण झाले होते. प्रियकराने स्वत:ला संपवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुढच्या दिवशी महिलेने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागे अन्य कारण आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. मालाड वेस्टमधील आएएनएस हमला बेसमधील रुममध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. माहितीनुसार, महिलेचे प्रशिक्षण पूर्ण होत आले होते.
महिला रुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. मालवानी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून याप्रकरणी तपास सुरु केला आहे. कुटुंबीय आणि हॉस्टेलमधील मैत्रिणींची चौकशी केली जात आहे. महिलेजवळ सुसाईट नोट आढळून आलेली नाही.
दरम्यान, अग्निवीर योजनेंतर्गत अग्निवीर जवानांना चार वर्षे सेवा देण्याची संधी दिली जाते. यामध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि साडेतीन वर्षांची प्रत्यक्ष सेवा याचा समावेश असतो. यानंतर अग्निवीर लष्करी सेवेमध्ये पूर्णकालीन सेवेसाठी अर्ज करु शकतात. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.