मुंबई

क्षयरोगाने पिडीत २५ वर्षीय महिलेने दिला बाळाला जन्म

CD

क्षयरोगाने पीडित महिलेने दिला बाळाला जन्म
आई-बाळ दोघे सुरक्षित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११: गर्भधारणेनंतर क्षयरोगाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २.२ किलो इतके असून प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
सलोनी मुरूडकर असे या महिलेचे नाव असून गर्भधारणेच्या ३४ आठवड्यांनंतर त्यांना श्वास लागणे, तीव्र खोकला आणि थकवा जाणवू लागला होता. वैद्यकीय चाचणीदरम्यान महिलेला क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले. अशा स्थितीत प्रसूती करणे खूप अवघड असते. क्षयरोग हा पसरणारा आजार असल्याने आईच्या गर्भातील बाळालाही क्षयाची लागण होऊ शकते, मात्र डॉक्टरांच्या यशानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला क्षयरोगाचा संसर्ग झालेला नाही.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. छातीचा एक्सरे केल्यानंतर महिलेला क्षयरोग असल्याचे निदान झाले. गरोदर महिलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण भारतात २१ टक्‍के आहे. क्षयरोगाचे अंदाजे प्रमाण १००० गर्भवती महिलांमध्ये २.३ आहे. गर्भधारणेदरम्यान क्षयरोगामुळे महिलेला अशक्तपणा, वेळेआधीच प्रसूती, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, प्रसूतीपूर्व मृत्यू होण्याचा धोका असतो. छातीचा एक्स-रे अहवाल आल्यानंतर लगेचच क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली, असे त्‍यांनी सांगितले.
सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रिया साधारणतः १८ तास चालली. रुग्णाने २.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर उच्च-रिझोल्यूशन कंप्युटेड टोमोग्राफी चाचणी केली गेली. या चाचणीत आईमधील क्षयरोगाची लक्षणे नियंत्रणात आली होती.

वेळेवर उपचाराची गरज
गरोदरपणात क्षयाची लागण झाल्यास वेळेवर उपचार करणे खूप गरजेचे असते. वेळीच निदान न झाल्यास आई किंवा गर्भातील बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. बाळाची प्रकृती आता उत्तम आहे. स्तनपान करताना नेहमी खास मास्क घालणे, वेळेवर औषधे घेणे आणि जलद बरे होण्यासाठी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT