crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करुन घेणारे त्रिकुट जेरबंद

बालिकेच्या आयुष्याशी खेळ; अनैतिक मानवी वाहतुकीच्या गर्तेतून मुक्तता

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: बांग्लादेशातून 14 वर्षीय मुलीला फुस लावुन भारतात पळवून आणुन तिच्याकडुन वेश्याव्यसाय करुन घेणाऱया दाम्पत्य व एक दलाल अशा तिघांना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने तळोजा येथील एका फ्लॅटवर छापा मारुन अटक केली आहे. तसेच या त्रिकुटाने वेश्याव्यसायासाठी लावलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

तळोजा फेज-1 मधील ऐव्हर शाईन सोसायटीत राहणाऱया दाम्पत्याकडुन 14 ते 15 वयोगटातील मुलीकडुन वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने तळोजा फेज-1 मधिल ऐव्हर शाईन सोसायटीतील संशयीत फ्लॅटवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर फ्लॅटवर छापा मारला. यावेळी मोहिनुर इस्माइल मंडल (37) व त्याची पत्नी मोहीनी ऊर्फ डॉली मोहीनूर मंडल (27) दलाल समोन धातुन शेख (27) तिघेही भाडÎाने घेतलेल्या सदर फ्लॅटमध्ये बांग्लादेशातून फुस लावून पळवून आणण्यात आलेल्या 14 वर्षे 4 महिन्यांच्या मुलीकडुन वेश्याव्यवसाय करुन घेताना आढळुन आले.

त्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पीडित मुलीची सुटका केली. तसेच पीडित मुलीला वेश्याव्यवसासाठी लावणाऱया तिघांना अटक केली. या कारवाईत अटक करण्यात आलेला दलाल समोन शेख व मोहीनी उर्फ डॉली हे दोघेही बांग्लादेशी असल्याचे व ते पासपोर्ट व व्हिजा शिवाय राहत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.

त्यामुळे या आरोपींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, पोक्सो तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियमासह विदेशी नागरीक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या पीडित मुलीला सीडब्ल्युसीसमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी दिली.

लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणून लावले वेश्याव्यवसायाला

या कारवाईत अटक करण्यात आलेला बांग्लादेशी दलाल समोन धातुन शेख याने या प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या 14 वर्षीय पीडित मुलीसोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यानंतर त्याने लग्न करण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला गत आठवडÎात घुसखोरीच्या मार्गाने भारतात आणल्याचे व त्यानंतर तळोजा येथे राहणाऱया मंडल दाम्पत्याच्या ताब्यात दिल्याचे तपासात निषफ्न झाले आहे.

मंडल दाम्पत्याने पीडित मुलीला विकण्याची तयारी करुन तिच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यापुर्वीच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने त्यांची धरपकड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT