मुंबई

कल्याण पश्चिमेतील मिठाईच्या दुकानाला आग

CD

कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : बेतूरकरपाडा येथील खंडेलवाल स्वीट मार्ट या मिठाईच्या दुकानाला गुरुवारी (ता. ३०) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील सामान जळून खाक झाले आहे; मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली आहे.

कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा परिसरातील विजय नगरातील खंडेलवाल स्वीट मार्ट दुकानाला गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील मिठाईसह सामान जळून खाक झाले. घटनास्थळी तातडीने कल्याण- डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या बंबाने पोहचत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणले. गॅस सिलिंडरपर्यंत आग पोहचली होती; मात्र सिलिंडरने पेट घेण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

कल्याण- डोंबिवली मनपाचे अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, देवघरातील दिवा, शॉर्टसर्किट अथवा अन्य कोणत्या कारणाने आग लागली हे तपासाअंती माहिती होईल. कल्याण- डोंबिवली पालिका क्षेत्रात वाढत्या आगीच्या घटना पाहता आता हॉटेल, दुकाने, रेस्टॉरंट, बारमध्ये आग नियंत्रणच्या उपाययोजना केल्या आहेत, याची तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच दुकाने, हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटमधील अग्निशमन यंत्रणा उपाययोजना प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT