Crime News esakal
मुंबई

Mira - Bhaindar Crime: तडीपार गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने केला हल्ला; प्रकृती चिंताजनक

सकाळ डिजिटल टीम

Mira - Bhaindar: मिरा-भाईंदरमधून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मीरा रोड येथे बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा घडली. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी गुंडासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या गुंडाचाच आणखी एक साथीदार काही तासांच्या अवधीत मिरा रोडमध्येच मृतावस्थेत आढळून आला.

सोनू मेंटल म्हणून ओळखला जाणाऱ्या गुंडाचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शहरातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील पूनम सागर परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सोनू मेंटलने त्याच्या दोन साथीदारांसह बिपिन सिंग आणि त्याच्या मित्रावर तलवारीने हल्ला केला.

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सिंग हे एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मेंटलला त्याच्या साथीदारांसह अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti: ६१ तासांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे; उसाला ४,२०० रुपयांपर्यंत दर

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

SCROLL FOR NEXT