Ulhasnagar News sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरात कोचिंग क्लासेसच्यावर लॉजिंग-बोर्डिंगचा धंदा; विद्यार्थिनीत भीतीचे सावट

Ulhasnagar News : कोचिंग क्लासेसच्या वर लॉजिंग-बोर्डिंगचा धंदा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विशेषतः कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीत भीतीचे सावट पसरले आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: शहरात लॉजिंग-बोर्डिंगचे जाळे पसरले असतानाच,आता उल्हासनगरात चक्क एका इमारतीत कोचिंग क्लासेसच्या वर लॉजिंग-बोर्डिंगचा धंदा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे विशेषतः कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीत भीतीचे सावट पसरले असून पालकांत संतापाची लाट पसरली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना प्रणित युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदरसिंग(विक्की)भुल्लर,शिवसेना विभागप्रमुख प्रमोद पांडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. विद्यार्थिनींना या सावटातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन हे लॉजिंग-बोर्डिंग बंद केले नाही तर शिवसेना स्टाईलने लॉजिंग-बोर्डिंग बंद करू असा ईशारा दिला आहे.

कॅम्प नंबर 1 मधील शहाड परिसरात अनेक वर्षांपासून एका इमारतीच्या पायथ्याशी चाणक्य कोचिंग क्लासेस सुरू आहे.याठिकाणी तळागाळातील नववी ते बारावीचे विद्यार्थी क्लासेससाठी येतात.त्यांच्याकडून माफक फी आकारण्यात येते.

मात्र अलीकडेच क्लासेसच्या वरच्या मजल्यावर ग्रेस नावाच्या लॉजिंग-बोर्डिंगचा धंदा सुरु करण्यात आला आहे.त्यामुळे या ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे.या परिस्थितीत जर अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण?असा सवाल,विक्की भुल्लर,प्रमोद पांडे यांनी उपस्थित केला आहे.

या ग्रेस लॉजिंग-बोर्डिंगमुळे क्लासेसमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे.तसेच स्थानिक नागरिकांचाही विरोध आहे.त्यामुळे पोलिसांनी ग्रेस लॉजिंग-बोर्डिंग बंद करून विद्यार्थिनींना,पालकांना,स्थानिक नागरिकांना मोकळा श्वास द्यावा अशी आमची मागणी आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने लॉजिंग-बोर्डिंगला बंद करण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला जाणार असा इशारा विक्की भुल्लर,प्रमोद पांडे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

उद्या 12 मार्चला बनतोय गजकेसरी राजयोग; 5 राशींना होणार फायदा पण 2 राशींचं होणार भयंकर नुकसान !

Illegal Hoarding : अनधिकृत होर्डिंग्जवर आजपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’; अतिक्रमण, बेवारस वाहने हटविणार

Mumbai Mhada: मुंबईतील 'या' इमारती म्हाडाच्या होणार, रहिवाशांना भाड्याचा पर्याय; नेमकी योजना काय?

SCROLL FOR NEXT