Mumbai Local Esakal
मुंबई

Mumbai Local : १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील प्रलंबित प्रश्नांबाबत आज दुपारी विभागीय कार्यालयात रेल्वे प्रवासी संघटनांची बैठक पार पडली. यामध्ये गेल्या १५ वर्षांत आसनगाव व कसारा येथे एकही लोकल वाढविण्यात आली नाही.

मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन रेल्वे वाहतूक वारंवार ठप्प होणे यासह आसनगाव येथील होम प्लॅटफॉर्म आदी विविध मागण्यांचे निवेदन प्रशानाला देण्यात आले. येत्या १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा प्रवासी संघटनांतर्फे देण्यात आला आहे.

कल्याण-कसारा मार्गावरील टिटवाळा ते कसारा दरम्यानची स्थानके गैरसोयींचे आगार झाली आहेत. प्रवाशांना विशेषतः महिला, वृद्ध व अपंगांना स्थानकात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्थानकांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप संघटनांकडून केला जात आहे.

आसनगाव येथे होम प्लॅटफॉर्मसह स्थानकाच्या पूर्वेला पादचारी पूल, सरकता जिना करणे, लिफ्टच्या कामाचा वेग वाढवणे, शौचालय बांधणे यांसह कसारा स्थानकात सरकता जिना व लिफ्ट बसवणे, खडवली स्थानकात पादचारी पूल, शौचालय दुरुस्ती तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, टिटवाळा स्थानकात सरकता जिना बसविणे, सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी ठाणे-आसनगाव-ठाणे शटल सर्व्हिस सुरू करून कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या वाढविणे, कल्याण-कसारा तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेच्या कामाचा वेग वाढवणे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत, जितेंद्र विशे, नंदकुमार देशमुख, लता आरगडे, केतन शहा, गोपीनाथ जाधव, मीना फर्डे यांसह विविध रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

रेल्वेचे पहिले पाढे पंचावन्न?

१) कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक पी. एन. रामचंद्रन आणि त्यांचे सहकारी रणजितकुमार यांची विशेष भेट घेऊन कसारा मार्गावरील लोकल प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा केली. आसनगावहून पहाटे ५.१५ व दुपारी १२.२५ च्या लोकलबाबत आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

२) शिवाय दीड-दोन तासांचे अंतर असलेल्या दोन लोकलच्या मध्ये आणखी एक लोकल वाढवावी, अशी मागणी करणारे पत्र देण्यात आले. यावर नेहमीप्रमाणेच तिसरी-चौथी मार्गिका, आसनगाव होमप्लॕटफॉर्म व स्टबलिंग लाईन झाल्यावर हे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT