MUMBAI SAKAL
मुंबई

Mumbai : अभियंत्यांना मारहाण झाल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंदावावा; म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ठाकरे गटाच्या कार्येकर्त्यांनी महापालिकेच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंत्याला केलेल्या मारहाणीनंतर पालिकेच्या कर्मचारी, अधिका-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्या सेवेतील कर्तव्य कशी बजवावीत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सेवा बजावताना अभियंत्यांना मारहाण झाल्यास तो अजामिनपात्र गुन्हा नोंदवता येईल असा कायदा करावा तसेच डॉक्टरांना मारहाण झाल्यास जो कायदा करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर कायदा करण्यात यावा अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली. याबाबत युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष, यशवंत धुरी यांनी माहिती दिली आहे.

वांद्रे पूर्व येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेवर गेल्या गुरुवारी पालिकेने तोडक कारवाई केली होती. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळांने या विभागातील पालिका कार्यालयात जाऊन तेथील सहायक अभियंत्याला जाब विचारत त्यांना मारहाण व धक्काबुक्की केली.

या विरोधात तक्रार एच - पूर्व विभागातील सहायक आयुक्त व अभियंते यांनी वाकोला पोलिस ठाण्यात येथे करण्यात आली असल्याचे युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला कार्यालयात जाऊन केलेल्या मारहाणीनंतर पालिकेतील कर्मचारी, अधिका-यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना घडत राहिल्यास अभियंता, कर्मचा-यांनी सेवेतील कर्तव्य कशी बजवावीत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मागील १० वर्षात अभियंत्यांवरील हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या विरोधात कर्मचारी, अभियंत्यांमध्ये संतापाच्य़ा प्रतिक्रिया आहेत. याविरोधात महापालिकेत कामबंद आंदोलन सुरु करावे असा दबाव अभियंता संघटना आणि कामगार संघटना यांच्यावर येतो आहे, असेही युनियनने म्हटले आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी महापालिकेत सेवा बजावत असताना अभियंत्यांना मारहाण झाल्यास तो अजामिनपात्र गुन्हा नोदवता येईल असा कायदा करावा अशी मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.

सातत्याने मागणी करूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. डॉक्टरांना कर्तव्य बजावताना मारहाण झाल्यास गुन्हा नोंदवून अटक करण्याचा कायदा करण्यात आला आहे. याच धर्तीवर अभियंत्यांना मारहाण प्रकरणीही कायदा करण्यात यावा अशी मागणी मंगळवारी पालिका आयुक्तांकडे पालिका अभियंता युनियनतर्फे करण्यात आली असल्याचे राजाध्यक्ष यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT