Mumbai Local  sakal
मुंबई

Navi Mumbai Local: मुंबईकरांचे हाल, 'या' मार्गावरील लोकल सेवा पहाटेपासून ठप्प

Nerul Panvel Local News: नेरुळ स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला असून, त्यामुळे हार्बर लाइनवरील अप-डाऊन सेवा पहाटेपासून ठप्प झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल सेवा विस्कळीत होत आहेत. आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नेरुळ स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला असून, त्यामुळे हार्बर लाइनवरील अप-डाऊन सेवा पहाटेपासून ठप्प झाली आहे.

दरम्यान हार्बर लाईनवरून पनवेल आणि ठाण्याच्या दिशेने धावणाऱ्या लोकलही यामुळे विस्कळीत झाल्या आहेत. ही सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन तास लागण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नोकरदार वर्ग पहाटेपासूनच कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी लोकलने प्रवास करत असतो. मात्र, नेरुळ स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याची कोणतीही माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात न आल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पहाटे साडेपाच वाजता ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेल ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या गेल्या दोन तासांपासून विस्कळीत झाल्या आहेत. यासह पनवेलहून ठाण्याकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

पनवेल, बेलापूर, वाशी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. सेवा सुरू होण्यासाठी आणखी दोन तास लागण्याची शक्यता आहे.

सध्या वाशी ते सीएसएमटी आणि वाशी ते ठाणे या मार्गावर लोकल सेवा सुरू आहे. मात्र, पनवेल ते वाशी आणि ठाणे ते पनवेल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासन तांत्रिक बिघाड दूर करण्यात प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT