मुंबई

MNS: मनसे कामगार अध्यक्षांच्या गाडीवर झाड कोसळले

Ulhasnagar News: रोडवरील डिव्हायडर्सच्या मध्ये मोठे झालेले झाड त्यांच्या गाडीवर कोसळले.

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News : उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्या गाडीवर झाड कोसळले असून त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.

पालिकेत मनसे कामगार सेनेचे युनिट अध्यक्ष असलेले दिलीप थोरात यांचे साई पूजा बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे ऑफिस लालचकी चौकात गुरुद्वाराच्या बाजूला आहे.त्यांची गाडी ऑफीस समोर उभी असतानाच रोडवरील डिव्हायडर्सच्या मध्ये मोठे झालेले झाड त्यांच्या गाडीवर कोसळले.

त्यामुळे गाडीचे प्रथमदर्शनी काचेचे नुकसान झाले आहे.थोरात यांनी अग्निशमन दलाला फोन केल्यावर जवानांनी झाडाच्या फांद्या छाटून टाकल्या.

ठेकेदाराने डिव्हायडर्सच्या मधील सर्व दगडे काढून टाकली आहेत.त्यामुळे झाड कोसळण्याची घटना घडल्याचा आरोप दिलीप थोरात यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT