Aadhar card sakal
मुंबई

आधारकार्डच ठरला विपुलचा स्वगृही परतण्याचा आधार

ठाणे शहर पोलिसांची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोणालाही न सांगता घरातून निघून गेला विपुल हा तब्बल सहा वर्षांनी ठाणे शहर पोलिसांमुळे नुकताच स्वगृही परतला. त्यातच त्याच्या चुलत भावाच्या लग्नाला तो परतल्याने कुटुंबाचा आंनद हा द्विगुणीत झाला आहे. दरम्यान त्याने अपडेप केलेल्या आधारकार्डच त्याच्यासाठी स्वगृही येण्यासाठी प्रमुख आधार ठरला आहे. तो दिल्लीत असल्याचे समोर आल्यावर ठाणे शहर पोलिसांनी दिल्ली,नोएडा येथे शोधून त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. कुटुंबाला पाहून विपुलच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. १९ वर्षांचा असताना निघून गेलेला विपुल आता २५ वर्षांचा झाला आहे.

मूळ गुजरात येथील रहिवासी असलेला विपुल हा लहानचा मोठा म्हणजे १९ वर्षांचा डोंबिवलीत त्याच्या काका यांच्याकडे राहून झाला. त्यातच त्याला त्याच्या काकांनी कपड्यांचे दुकान ही उघडून दिले होते. मात्र, तो शांत स्वभावाचा आणि कमी बोलणार असल्याने त्याला तेथे कंटाळा येत होता. त्यातूनच तो कोणालाही काही न सांगता, घरातून ७ मे २०१६ मध्ये अचानक निघून गेला होता. सुरुवातीचे दोन वर्षे तो कर्नाटक येथे राहिला. त्यानंतर, तो दिल्लीत गेला. तेथील एका आश्रमात गेली चार वर्षांपासून काम करून राहत आहे. याचदरम्यान त्याने त्याचा आधारकार्ड अपडेट केला.

त्या आधारकार्ड वरील पत्ता हा गावाकडील असल्याने अपडेट आधारकार्ड गावाच्या पत्त्यावर पोस्ट झाला. आलेला आधारकार्डवरील माहितीवरून त्याच्या नातेवाईकांनी डोंबिवली पोलीस ठाणे गाठत आधारकार्डची माहिती पोलिसांना दिली. मग,मानव मिसींगचा समांतर तपास डोंबिवली पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे पथकाने सुरू केला. वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण यांच्या पथकाने शोध सुरू करून त्याचा अवघ्या १५ दिवसात नोएडा येथून शोधून त्याला स्वगृही आणले.

त्याने अपडेट केलेल्या आधारकार्डच त्याला घरवापसीचा आधार ठरला. त्याच्या मनात घरी येण्याची इच्छा होती. पण घरातील रागावतील या भीती तो येणे टाळत होता. तो आश्रमात गोरगरिबांना जेवण वाटपाचे काम करत असे. तसेच तेथे तो मित्रांसोबत राहत होता. कुटुंबात आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यातच त्याच्या चुलत भावाचे लग्न असल्याने त्या कुटुंबाचा द्विगुणीत झाल्याचे प्रखरतेने दिसत होते.

- प्रीती चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक, ठाणे शहर पोलीस दल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT