Panther sakal media
मुंबई

मुंबई : बिबट्याचा मानवी वस्तीत वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मिलिंद तांबे

मुंबई : आरे परीसराजवळील (Aare society) मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा (panther) वावर वाढला आहे. सोमवारी रात्री देखील युनिट 31 मधील एका घरामध्ये बिबट्या शिरल्याने दहशत पसरली आहे. तर महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात (panther attack) दोन जण जखमी ही झाले आहेत. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (sanjay Gandhi national park) विभागाने यासंदर्भात योग्य पावलं उचलण्याची मागणी होऊ लागली आहे.

सोमवारी रात्री युनिट 31 मधील घरात बिबट्या भक्ष्याच्या शोधात आल्याचे दिसले. तर रविवारी युनिट 3 मधील एक लहान मुल बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले. यापूर्वी एक महिला देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली होती. हल्ल्यांशिवाय बिबट्याचा आसपासच्या मानवी वस्तीत वावर असल्याचे अनेकदा दिसले आहे. अलीकडे आरे परिसरातील वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला असून राहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे आदिवासी हक्क संवर्धन समितीचे भूषण भोईर यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच मुलाच्या लग्न समारंभाआधी मांडवात बिबट्याचे दर्शन झाल्याचे ही त्यांनी सांगितले. स्वसंरक्षाचे धडे लोकांना देणे गरजेचे असून प्रशासनाने त्यासाठी विशेष पथक बनवणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले.

panther

आरे परिसरात अनधिकृत बांधकामाचं पेव्ह फुटलं आहे. त्यामुळे जंगल कमी होत असल्याचे कार्यकर्ते संदीप परब यांनी सांगितले. बिबट्यांची संख्या वाढत असून ते नाईलाजाने मानवी वस्तीत घुसत असल्याचे ही परब सांगतात. त्यामुळे अनधिकृत बांधकाम थांबवून संपूर्ण आरे परिसरतील 2500 एकर चा परिसर जंगल घोषित करणे गरजेचे असल्याचे ह त्यांनी पुढे सांगितले. याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

बछडा रेस्कू

आरेच्या युनिट 22 ने बिबट्याचा छोटा बछडा रेस्कू केला. हा बछडा आरे मेट्रोच्या कारशेड जवळ सापडला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.काही दिवसांपूर्वीच या बछड्याचा जन्म झाला असावा असे सांगण्यात आले. बिबट्याच्या बछड्याच्या माध्यमातून तो सापडलेल्या ठिकाणाकाजवळ त्याचा आईला शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT