Save-Aarey sakal
मुंबई

Mumbai Metro: 'आरे'तच कारशेड होणार; शिंदे फडणवीस सरकारने बंदी उठवली

महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर बंदी घातली होती.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबई मेट्रोचे आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेडवर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

(Aarey Car Shed Update)

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा प्रकल्प सुरू होणार अशा चर्चा चालू होत्या.

दरम्यान, महाविकास आघाडीने मेट्रोच्या कार्यकारी संचालक असलेल्या आश्विनी भिडे यांची बदली केली होती पण शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा आश्विनी भिडे यांच्याकडे सोपवला होता. त्यामुळे कारशेडचे काम पुन्हा सुरू होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता सरकारने कारशेडवरील बंदी उठवल्यामुळे मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यावर आदित्य ठाकरे यांनी 'आरे जंगल वाचवा मोहिम' काढली होती. या आंदोलनावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनानंतरही काही पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन केले जाणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline: ITR भरण्याची शेवटची तारीख कधी? डेडलाइन चुकली तर भरावा लागेल 5,000 रुपयांचा दंड

NEET-UG री-एग्जामसाठी NTA ची नवी अॅडव्हायजरी! ड्रेस कोड आणि बायोमेट्रिक पडताळणीबाबत महत्त्वाचे निर्देश

Mumbai Local Megablock: मुंबईकरांचा रविवारी प्रवास आरामदायी होणार! लोकल वेळेनुसारच धावणार, का घेतला निर्णय?

Samsungचा नवा AI पेट केअर फीचर! आता फक्त एका फोटोवरून कळणार तुमच्या पाळीव प्राण्याला काय आजार झालाय

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता आठवड्यातून फक्त एक दिवस द्यावी लागणार उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT