मुंबई

अभी वो मनाली नही जायेंगा

Print

‘अभी वो मनाली नही जायेंगा ’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.९ : आपल्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावून अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आरोपी मॉरीसभाई कार्यालयाबाहेर हातात रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आला. आणि मोठ्या आवाजात ‘आय किल्ड अभिषेक, वो कल मनाली नहीं जायेगा’ असे ओरडल्याचे समजते.

अभिषेक घोसाळकर यांच्या लग्नाचा १३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. मनाली येथे तो साजरा करण्याचे नियोजनही अभिषेकने केले होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली. कार्यालयात गोळ्या झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या अभिषेक घोसाळकर याला कार्यालयाबाहेर फरफट नेल्याचे एका साक्षीदाराने सांगितले. त्यानंतर जेव्हा अभिषेक यांचे समर्थक आणि लोक जमायला लागले, तेव्हा जमाव बघितल्यानंतर घाबरलेल्या मॉरिसने त्या पिस्तुलाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गोळीबारात वापरलेले शस्त्र हे अवैध शस्त्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मॉरिसकडे शस्त्र परवाना नसल्याचेही सांगितले जात आहे. त्याने रिव्हॉल्वर कोठून आणि कसे मिळवले, याचा पोलिस तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT