Abhishek Ghosalkar esakal
मुंबई

Mumbai News : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट

दहिसर शूट आऊट प्रकरण; अमरेंद्र मिश्राच्या जामीन अर्जाला पोलिसांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून, या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असून, याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात असून पोलिसांनी हल्लेखोर मॉरिस नोऱ्हानो याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक केली.

मॉरिसने ज्या पिस्तूलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तुल मॉरिसचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. अमरेंद्र याच्या जवळ पिस्तुल असणे आवश्यक होते. मात्र या प्रकरणात त्याचा हलगर्जीपणा समोर आला आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र कायदा २९ (ब) व ३० अंतर्गत त्याला पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात अमरेंद्र मिश्रा याने ऍड. शंभू झा यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (ता.२) न्या. राजेश सासणे यांच्या समोर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालय जामीन अर्जावर ५ मार्च रोजी निकाल सुनावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT