मुंबई

पत्नीच्या मनाविरोधात गर्भपात करणाऱ्या पतीसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

अंबरनाथ : पत्नीच्या मनाविरोधात गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या पतीसह तीन जणांविरोधात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पती अमृत याला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


अंबरनाथच्या वडवली भागात राहणाऱ्या पीडित महिलेचा विवाह कुर्ला येथे राहणाऱ्या अमृत सामनेरकर याच्यासोबत डिसेंबर 2017 मध्ये झाला होता. ऑक्‍टोबर 2018 मध्ये गरोदर असलेल्या महिलेने त्याबाबत नवरा अमृत सामनेरकर याला सांगितल्यानंतर त्याने जबाबदारी झटकण्यास सुरुवात करून मुलाचा सांभाळ मी करू शकत नसल्याचे सांगितले. पीडित महिलेने बाळाला जन्म देण्याची मानसिक तयारी दाखवूनही अमृत याने पत्नीला गर्भपाताच्या गोळ्या देत तिचा गर्भपात केला.

त्या गोळ्यांचा त्रास झाल्यावर तिला रुग्णालयातही हलवले नाही. याबाबत महिलेच्या माहेरच्यांना माहिती कळताच त्यांनी तिला अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. त्यानंतर पुन्हा त्रास देणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून पीडितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पती अमृत सामनेरकर, सासू कल्पना सामनेरकर आणि सासरे शशिकांत सामनेरकर यांच्याविरोधात 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT