varsha-gaikwad.jpg 
मुंबई

दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड करणार मोठी घोषणा

संजीव भागवत

मुंबई - राज्यात वाढलेला कोरोनाचा कहर लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा मोठा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या आज दुपारी जाहीर करणार आहेत. मुंबई, पुणे,नागपूर, औरंगाबाद, अमरावती आदी शहरांची परिस्थिती लक्षात घेता राज्यभरातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र देण्याचा निर्णय आज जाहीर केला जाणार आहे. यामुळे राज्यातील तब्बल 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दुपारी पत्रकार परिषदेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहेत. या मार्गदर्शक सूचनामध्ये प्रामुख्याने परीक्षा केंद्र परीक्षा मूल्यांकन, प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा संदर्भातील नवीन धोरण आदी प्रमुख विषय असल्याचे सांगण्यात येते.

राज्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने नुकतीच परीक्षांच्या नियोजनासंदर्भात सल्लागार समिती स्थापन केली होती. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून या समितीकडून जे विद्यार्थी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत त्याच शाळांमध्ये परीक्षा केंद्र देण्याची शिफारस केली आहे. या सोबतच दहावी बारावीच्या परीक्षांच्या मूल्यांकन या संदर्भात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना काही अधिकार देण्याची मागणी केली जात असून त्यावरही निर्णय ही घेतला जाणार असल्याची शक्यता  शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पालक संघटनांकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाव्यात,अशी मागणी केली जात आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाला या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्याने या परीक्षा ऑफलाईन अर्ज घेऊन त्यामध्ये विविध प्रकारचे बदल केले जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांची लेखी परीक्षा अडचणीची होणार नाही यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना तयार केल्या असल्याचे सांगण्यात आले.

(संपादन - दीनानाथ परब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT