मुंबई

पेणमध्ये नराधमाचा तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

राजेश कांबळे

पेण  - पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या माठीमागे असणा-या मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करून तीचा खून करण्यात आल्याच घटना घडली आहे. प्रकरणी पेण पोलिसांनी एक तासात आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली असल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील कुटुंब रात्री आपल्या घरात झोपले होते. मात्र सदर घराला दरवाजा नसल्याचे पाहून त्याच परिसरात राहणारा आरोपी आदेश मधूकर पाटील वय (34) रा.साबर सोसायटी, मुळ गाव गागोदे पेण यांंने रात्री 11 ते 12 च्या दरम्यान तीच्या घरात प्रवेश करून तीला जवळपास 200 मिटरवर उचलून नेले व तीच्यावर अतिप्रसंग करून तीचा खून केला. यावर कुटुंबांनी शोधाशोध केली असता त्यांना सदर मुलाचा अदांज समजल्यावर त्या वर्णनानुसार पेण पोलिस पथकांने आरोपीच्या घरी जावून आरोपीला ताब्यात घेतले. सदर तपासाअंती या मुलानी दोन वेळा असेच प्रकार केले असून यापुर्वी अटक होता सदर प्रकार हा अतिशय घृणास्पद तसेच काळीमा फासणारी घटना आहे. याप्रकरणी आरोपीवर कलम 376 (i) (j),363,366(A),448,302,201बाल लैंगिक अत्याच्यार पोस्को, अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 सह अनुसूचित जाती अन्याय अत्याचार अधिनियम 1989, व सुधारण अधिनियम 2015 चे कलम 3(I)(w), (i)(ii), 3 (2) (v) प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी डीवायएसपी विद्या चव्हाण,पीआय बाळकृष्ण जाधव,पी. आर.कुंभार,पोलिस उपनिरीक्षक आव्हाड,एलसीपीच्या कोमन,कदम यासह इतर पोलिस कर्मचारी यांची विशेष पथक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

abuse and murders three year old girl in Pen Accused in police custody

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT