Accident  
मुंबई

Accident : एका चप्पलमुळे तरुणाने गमावला जीव; सायन-पनवेल महामार्गावरील घटना

रवींद्र देशमुख

नवी मुंबई : कामोठे येथून दुचाकीने चेंबूर येथे जाताना खाली पडलेली चप्पल घेण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणाला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे. सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाण पुलावर ही घटना घडली असून सीबीडी पोलिसांनी फरारी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत कुटुंबासह राहणारा अतीश कांबळे (२५) हा तरुण १ मे रोजी कामोठे येथील त्याचा मित्र राजू गोरे याच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. अतीश व त्याचा मित्र मनोज दोघेही रात्री चेंबूर येथून दुचाकीवरून कामोठे येथे गेले होते.

यावेळी मित्राच्या आईचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर पहाटे दीडच्या सुमारास दोघेही चेंबूरला जाण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान पहाटे दोनच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाण पुलावर आले असताना पाठीमागे बसलेल्या अतीशची चप्पल रस्त्यावर पडली.

त्यामुळे उड्डाण पुलावर मोटारसायकल थांबवल्यानंतर चप्पल घेण्यासाठी पाठीमागे चालत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने अतीशला समोरून जोरात धडक दिली होती. यावेळी अतीशला नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT