Eknath Shinde esakal
मुंबई

Eknath Shinde: अधिवेशनासाठी जाताना रिक्षाचा अपघात, CM शिंदेंनी ताफा थांबविला अन्....संवेदनशील स्वभावाचे झाले पुन्हा दर्शन

Eknath Shinde News In Marathi: मुख्यमंत्री शिंदे यांचा हा संवेदनशील आणि माणुसकीपूर्ण दृष्टिकोन त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

Sandip Kapde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अपघातामध्ये एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबविला आणि त्या महिलेकडे  गेले.

त्यांनी जखमी महिलेला विचारपूस करून तिच्या प्रकृतीची चौकशी केली. महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे जाणून त्यांनी आपल्या ताफ्यातील अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. केवळ अॅम्ब्युलन्स नाही, तर आपल्या अधिकाऱ्याला सोबत देऊन महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

या कृतीमुळे जखमी महिलेला वेळीच मदत मिळाली आणि तिच्या जीवाला मोठा धोका टळला. या मदतीबद्दल त्या महिलेनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, या प्रसंगामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही छबी पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या कृतीची प्रशंसा सर्वत्र होत आहे. जनतेच्या सेवा आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची ओळख आहे. विक्रोळीतील हा प्रसंग त्यांच्या जनसेवेच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा हा संवेदनशील आणि माणुसकीपूर्ण दृष्टिकोन त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

Aadul Rain : आडूळ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान

Ambad lightning : अंबड शहरासह परिसरात वादळ, वाऱ्यासह गारा; वीज पडुन दोन युवकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT