Accident News sakal
मुंबई

Accident News : मालगाडीच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू महिलेजवळ सापडली सावकार विरुद्ध तक्रारीची प्रत

कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील घटना,

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एक 46 वर्षीय महिला मृतावस्थेत कल्याण लोहमार्ग पोलिसांना आढळून आली होती. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेजवळ एक तकारीची प्रत पोलिसांना आढळून आली आहे.

यामध्ये चार दिवसांपूर्वीच या महिलेने उल्हासनगर पोलीस ठाण्यात ती राहत असलेल्या परिसरातील सावकाराकडून छळ होत असल्याची तक्रार दाखल केली असल्याची बाब यामुळे उघडकीस आली आहे.

कल्याण रेल्वे पोलिसांना गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास आंबिवली आणि शहाड स्थानकादरम्यान मालगाडीने एका महिलेला धडक दिल्याचा फोन आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

खळबळ जनक बाब म्हणजे मृत महिलेच्याजवळ पोलिसांना दिलेली तक्रारीची प्रत सापडली. ही महिला शहाड येथील रहिवासी असून तिला दोन मुलबआहेत. तिचा पती कपड्याच्या दुकानात काम करतात.

या घटनेचा तपास पीआय अर्चना दुसाने या करत असून त्या म्हणाल्या, "मालगाडीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत महिलेने चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलिस ठाण्यात सावकार कडून छळ केला जात असल्याची तक्रार दाखल केली होती. यामध्ये एका सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये कर्ज घेतले होते.

ते कर्ज फेडण्यासाठी सावकार छळ केल्याची तक्रार नोंदवली होती. महिलेचा मृत्यू झाल्यावर त्या तक्रारीची प्रत रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी कोणाच्याही विरोधात तक्रार न केल्यामुळे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT