File Photo 
मुंबई

रायगड पोलिस दलातील दोघांचा अकस्मात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : रायगड पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई अशा दोघांचा शुक्रवारी (ता. १६) अकस्मात मृत्यू झाला. या प्रकरणी अलिबाग व नागोठणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत श्रीधर कनेरकर (५०) यांनी गळफास घेऊन त्यांचे जीवन संपविले; तर पोलिस शिपाई मनोज हंबीर यांचे हृदविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

रायगड पोलिस दलातील प्रशांत कनेरकर १५ ऑगस्ट रोजी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये ड्युटीवर होते. १६ ऑगस्ट रोजी ड्युटी संपल्यावर ते आराम करण्यासाठी घरी गेले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घरी गेलेल्या एका कर्मचाऱयाने दरवाजा ठोकूनही काहीही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर खिडकीतून पाहिल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

त्यांना अलिबाग रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजले नाही. सहा पोलिस निरीक्षक सागर कावळे तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेतील पाली पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेले मनोज हंबीर बिट मार्शल पथकाचे नेतृत्व करीत होते. अंबा नदीला आलेल्या पुराच्या वेळी कोणतीही हानी होऊ नये म्हणून रात्रीचा दिवस करून त्यांनी पुलाजवळ पहारा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

१६ ऑगस्ट रोजी पाली पोलिस ठाण्यात ड्युटीवर असताना त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना नागोठणे येथील दवाखान्यात दाखल केले होते; मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Pune Cold Wave: पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर

SCROLL FOR NEXT