Crime Branch of Mira Bhayandar-Vasai Virar
Crime Branch of Mira Bhayandar-Vasai Virar  esakal
मुंबई

Crime Branch : बदला घेऊन महिलेसह 4 मुलांची हत्या; 28 वर्षांनंतर पहिल्या आरोपीला अटक

सकाळ डिजिटल टीम

बदला घेण्याच्या उद्देशानं आरोपीनं महिला आणि 4 मुलांची हत्या केली होती.

मुंबई : महिला आणि तिच्या चार मुलांच्या हत्येप्रकरणी 28 वर्षांनंतर पहिल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, मीरा भाईंदर वसई विरार (Mira Bhayandar Police MBVV) पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी पहिली अटक केली.

नोव्हेंबर 1994 च्या हत्येमध्ये कथितपणे सहभागी असलेल्या तीनपैकी एक असलेल्या राजकुमार चौहानला मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) अटक करण्यात आलीये. अन्य दोघे अनिल आणि सुनील सरोज फरार आहेत.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविराज कुराडे यांनी अशा प्रकरणांची यादी मागवली होती. या यादीत एकूण 11 प्रकरणं आढळून आली. त्यातील सर्वात क्रूर घटना म्हणजे, जागराणी देवी प्रजापती (वय 27) आणि तिच्या चार मुलांची हत्या. कुराडेंनी सांगितलं की, 'जागराणी देवी यांच्या पतीचा 2006 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. जून 2021 मध्ये एक पथक राज्यात पाठवण्यात आलं होतं. यूपी स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीनं आरोपींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.'

तपासाअंती राजकुमार चौहान उर्फ ​​कालिया हा कतारचा रहिवासी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याच्या पासपोर्टची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना त्याच्याविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं. गुरुवारी चौहान मुंबईत आल्यावर त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं. यानंतर एमबीव्हीव्ही पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Pune School: स्कॉरलशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

Sharad Pawar on Narendra Modi: नरेंद्र मोदींनी कुठं कुटुंब सांभाळलं... शरद पवारांचा पलटवार! नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT