मुंबई

ठकठक टोळीच्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक

CD

ठकठक टोळीच्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक
६० हून अधिक गुन्ह्यांची उकल; २१ मोबाईल हस्तगत
अंधेरी, ता. ८ (बातमीदार) ः ठकठक टोळीच्या दोन रेकॉर्डवरील आरोपींना मालाड पोलिसांनी अटक केली. फईम शमीम शेख आणि मोहम्मद फईम अलमुद्दीन खान ऊर्फ बिल्ला अशी दोघांची नावे आहेत. त्यांच्या अटकेने ६० हून अधिक गुन्ह्यांची उकल झाली असून २१ चोरीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी सांगितले.
मार्च महिन्यात एका व्यक्तीशी त्याच्या कारने अपघात केल्याचा आरोप करून दोघांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान एकाने त्याच्या कारमधील महागडा आयफोन चोरी करून पलायन केले होते. याप्रकरणी मालाड पोलिसांत मोबाईल चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. सीसी टीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी मालाड येथून मोहम्मद फईम आणि फईम शेख या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही ठकठक टोळीचे सदस्य असून त्यांनी मुंबईसह ठाणे ग्रामीण, दिल्ली, बंगलोर शहरात अशाच प्रकारे अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी वर्तविली आहे.

कारमधील मौल्‍यवान वस्‍तूंची चोरी
वाहनांच्या काचांवर ठकठक करून, कारचालकांचे लक्ष विचलित करून कारमधील मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तू चोरी करणारे हे सराईत गुन्हेगार आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT