Accused from UP arrested for rape in rickshaw Mumbai crime police sakal
मुंबई

Mumbai Crime : मुंबईत रिक्षामध्ये महिला प्रवाशावर बलात्कार केल्याप्रकरणी यूपीतून आरोपीला अटक

गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू करत रिक्षाचालकाला रविवारी उत्तर प्रदेशामधून अटक केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 20 वर्षीय महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरे पोलिसांनी 24 वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी रात्री अटक केली. ही घटना मे महिन्यात घडली होती परंतु महिलेने नुकतीच 6 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.

गोरेगाव पोलिसांनी तपास सुरू करत रिक्षाचालकाला रविवारी उत्तर प्रदेशामधून अटक केली.इंद्रजित सिंग असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहते. बेलापूर येथून 17 मे रोजी ती रिक्षाने गोरेगाव येथे जात होती. रिक्षा आरे जंगलाजवळ निर्जन स्थळी आल्यावर चालकाने लघुशंकेचे निमित्त करून रिक्षा थांबवली.

परिसरात कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने तरुणीला धाक दाखवून रिक्षाबाहेर नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केली आणि या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणाकडेही वाच्चता केली नाही. मात्र या घटनेनंतर तिची प्रकृती बिघडली. या घटनेनंतर पीडित महिला मानसिक तणावाखाली होती. तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केली असता एका रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलीस ठाण्यात तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर झालेल्या बलात्काराबाबतची माहिती तिने दिली. याप्रकरणी 6 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT