crime esakal
मुंबई

Mumbai Crime : सिलिंडर पेटवण्याची रहिवाशांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांनाही केली मारहाण

घाटकोपर पूर्व परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने गॅस सिलिंडरचा स्फोट करून सर्व रहिवाशांना जाळून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - घाटकोपर पूर्व परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने गॅस सिलिंडरचा स्फोट करून सर्व रहिवाशांना जाळून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचून पंतनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू लागले.

अर्धातास चाललेल्या थरारानंतर अखेर पोलिसांनी आरोपी विनोद शर्माला अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी मारहाणीचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 2 गुन्हे पंतनगर पोलीस ठाणे, तसेच पार्कसाईट पोलीस ठाणे आणि टिळक नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

घाटकोपर पूर्व परिसरातील रहिवासी वस्तीत राहणाऱ्या आरोपी विनोद शर्माचे तेथील काही रहिवाशांबरोबर पूर्वीपासून वाद होते. गुरूवारी काही कारणाने विनोदचा स्थानिक रहिवाशांशी वाद झाला. आरोपीने स्थानिक नागरिकांना शिवीगाळ केली.

तसेच त्यांना धमकावण्यासाठी घरातून गॅस सिलिंडर घेऊन आला. आरोपी विनोद गॅस सिलिंडरचा स्फोट करून रहिवाशांना जाळून ठार मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक रहिवाशांमार्फत घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुरुवातीला विनोदला गोड बोलून समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो पोलिसाना बधत नव्हता. आरोपीला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की करून मारहाण केली.

इतर पोलिसांनी अखेर शर्थीचे प्रयत्न करून ताब्यात घेतले. त्यानंतर गुरूवारी आरोपी विनोद शर्मा विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT