Crime Sakal
मुंबई

Mumbai News : ताज हॉटेलवर हल्ल्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

पाकिस्तानी दहशतवादी हॉटेल ताजवर हल्ला करणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सांताक्रुझ येथून अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अरबी समुद्रामार्गे भारतात आलेले 2 पाकिस्तानी दहशतवादी हॉटेल ताजवर हल्ला करणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सांताक्रुझ येथून अटक केली आहे.

जगदंबा प्रसाद सिंह असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, तो व्यवसायाने आचारी आहे. आरोपी सांताक्रुझ पश्चिमेकडील गोळीबार रोड परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी जगदंबा सिंहने गुरुवारी संध्याकाळी पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला होणार असल्याची खोटी माहिती दिली.

आरोपीने नियंत्रण कक्षाला उर्दूमध्ये फेसबुक पोस्ट पाहिली असून त्यात दोन पाकिस्तानी सागरी मार्गाने मुंबईत येतील आणि ताज हॉटेलवर हल्ला करतील, असे लिहिल्याचे सांगितले.

या नंतर सुरक्षा यंत्रणांनी हॉटेल ताजभोवती सुरक्षा वाढवून आढावा घेतला. पण कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नाही. अखेर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने उत्तर दिले नाही.

अखेर गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेण्यात आला

गुन्हे शाखेच्या कक्ष 9 याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन तपासले असता सांताक्रुझ येथे सापडले. तातडीने आरोपीला ताब्यात घेतले गेले. आरोपी जगदंबा सिंहने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT