Accused who threatened bomb explosion in Mumbai arrested mumbai police  Sakal
मुंबई

Crime News : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा आरोपी अटकेत....

आरोपीचे नाव नरेंद्र कवळे असे असून त्याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फसवा कॉल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.आरोपीचे नाव नरेंद्र कवळे असे असून त्याला धारावी परिसरातून अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून बॉम्बच्या धमकीची माहिती दिल्यानंतर गेले गुन्हा दाखल करण्यात आला होता.शुक्रवारी रात्री 8.50 च्या सुमारास फोन करण्यात आला.

त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले की एक व्यक्ती काही शस्त्रे आणि आरडीएक्स स्फोटक घेऊन उत्तर प्रदेशातून निघून गेली आहे. त्यानंतर त्याने नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याला एटीएसचा संपर्क क्रमांक देण्यास सांगितले आणि नंतर फोन बंद केला.

फोन करणारा हा मुंबईचा असून त्याने मोबाईल क्रमांकावरून कॉल केल्याचे तपासात समोर आले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात काही ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे त्यांनी नियंत्रण कक्षाला सांगितले.

त्यानंतर आरोपीचे नाव नरेंद्र कवळे असे असून तो धारावी परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसाना महिती मिळाली. त्वरित आरोपीला धारावी परिसरातून पोलिसांना फसवणूक करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT