मुंबई

रस्ते, स्मशान, उद्यानांसाठी भूखंडांचे संपादन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत मोकळे भूखंड शिल्लक नाहीत. अनेक ठिकाणी भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मुंबईकरांना चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिका सार्वजनिक उद्दिष्टांसाठी राखीव असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे. असे भूखंड संपादित करण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहेत.

रस्ते, उद्याने, मैदानांसाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील भूखंड संपादित करण्यात येणार आहेत. बोरिवली पश्‍चिम येथील कान्हेरी भागातील भूखंड मनोरंजन मैदानासाठी आरक्षित आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार सिंचन आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे बाधित होणारी जमीन खरेदी करण्यास कायदेशीर अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दोन कोटी ५३ लाख ४५ हजार रुपये महापालिका मोजणार आहे.

सार्वजनिक उद्दिष्टांसाठी आरक्षित असलेले भूखंड संपादित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमानुसार खरेदी सूचना बजावण्यात आली आहे. उद्यान, क्रीडांगण, सामाजिक सुविधा, महापालिका शाळा आणि रस्ता यासाठी दहिसर गाव येथील जमीन संपादित केली जाणार आहे. भूखंड संपादनासाठी महापालिका २५ कोटी ३७ लाख ७८ हजार रुपये खर्च करणार आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला वार्षिक अनुदान, कुटुंबातील एकाला नोकरी किंवा प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपये देऊन भूसंपादन केले जाणार आहे.

पोयसर येथील भूखंड स्मशानभूमीसाठी घेतला जाणार आहे. हा निवासी पट्ट्यातील भूखंड ६० फूट रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याने बाधित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT