मुंबई

Shivsena: राणेंची सभा उधळल्याचे प्रकरण; अठरा शिवसैनिकांची निर्दोष सुटका

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००५मध्ये शिवसैनिकांनी त्यांची सभा उधळवून लावली होती. याप्रकरणी ४७ शिवसैनिकांविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने १८ शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. हे १८ जण जाखादेवी येथे करण्यात आलेल्या निदर्शनातील आरोपी होते.


शिवसेनेच्या विशाखा राऊत, महेश सावंत व इतरांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणात खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई आदींसह २८ शिवसैनिकांची न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष सुटका केली आहे. एकाचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते.


प्रभादेवीत राणे समर्थकांनी २४ जुलै २००५ रोजी सभा आयोजित केली होती. या सभेत शिवसैनिक घुसले व राणे समर्थकांना भिडले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्याला गुडघ्याला इजा झाली.

याप्रकरणी पोलिसांनी ४७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. आरोपींमध्ये खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार रवींद्र वायकर, किरण पावसकर, दगडू सकपाळ, विशाखा राऊत व इतर शिवसैनिकांचा समावेश आहे. याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हा खटला चालला.

साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असण्याबरोबरच आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावेच नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शिवसैनिकांना दिलासा दिला व त्यांची निर्दोष मुक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT