Shivsena Uddhav Thackeray
Shivsena Uddhav Thackeray Sakal
मुंबई

Oppositon Parties rally in Mumbai: मुंबईत देशभरातील विरोधकांची होणार सभा; उद्धव ठाकरे करणार नेतृत्व

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत निकाल दिल्यानंतर आता देशभरातील विरोधकांची एकत्र सभा मुंबईत पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सभेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना घेरण्यासाठीच ही रणनीती आखली जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहेत. (across country Opposition Parties rally in Mumbai Uddhav Thackeray will do lead)

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी आपण देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधल्याची माहिती दिली होती. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, ममता बँनर्जी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होता.

दरम्यान, आता जी माहिती समोर येत आहे, त्यानुसार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेच्यावतीनं विरोधीपक्षांची भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सगळेच विरोधीपक्षाचे प्रमुख नेते हजेरी लावतील. यामध्ये मोदी-शहांविरोधात एल्गार पुकारण्याची रणनीती आखण्यात येणार आहे. या संदर्भात शरद पवारांशी आपलं बोलणं झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली होती. तसेच याबाबत ममता बॅनर्जींना देखील त्यांनी याबाबत कल्पना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT