Action against 200 rickshaw drivers 5 days special operation Mumbai traffic police esakal
मुंबई

Mumbai : मुंबई वाहतूक पोलिसांकडून 200 हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई

बोरिवली आणि वांद्रे या संदर्भात मोठ्या संख्येने कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांकडून मागील 5 दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 200 हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया हॅण्डलवर रिक्षाचालकांबाबत वारंवार अनेक आलेल्या होत्या.

तक्रारींनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ते 5 मे दरम्यान 257 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. बोरिवली आणि वांद्रे या संदर्भात मोठ्या संख्येने कारवाई करण्यात आली.

बोरिवलीमध्ये 257 पैकी 221 चालकांना विशेषत: रेल्वे स्थानक परिसराबाहेर दंड ठोठावण्यात आला आहे. भाडे नाकारल्याबद्दल सुमारे 170, अतिरिक्त प्रवासी घेऊन जाण्यासाठी 3, चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल 9, नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबद्दल 6, परवान्याशिवाय वाहन चालवल्याबद्दल 1 आणि इतर उल्लंघनांसाठी 32 रिक्षा चालकांना दंड करण्यात आला.

त्याचप्रमाणे वांद्रे रेल्वे स्थानक परिसराबाहेर, वाहतूक पोलिसांनी ऑटो स्टँडबाहेर पार्किंग केल्याबद्दल सात ऑटो चालकांना, 'नो-एंट्री' झोनमध्ये प्रवेश केल्याबद्दल 16, नो-पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबद्दल 4 आणि भाडे नाकारल्याबद्दल 9 वाहनचालकांना दंड केला.

आकडेवारीत 1 एप्रिल ते 4 मे दरम्यान एसव्हीपी रोड गिरगाव येथे ऑपेरा जंक्शन ते अलंकार हाऊसपर्यंत 1357 वाहनांना दंड ठोठावण्यात आला आहे . आश्चर्याची बाब म्हणजे वाहतूक पोलिसांनी प्रथमच ही आकडेवारी ट्विटरवर फ्लॅश केली. या आकडेवारीची माहिती शोषल मीडियावर प्रसिद्ध करण्यामागील पोलिसांचा उद्देश म्हणजे लोकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT