Kishori-Pednekar e sakal
मुंबई

अविघ्न पार्क आगीला व्यवस्थापन जबाबदार, कारवाई करणार - महापौर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लालबागच्या वन अविघ्न पार्क (avighna park fire mumbai) येथे इमारतीला आग लागली असून लेव्हल चारची ही आग आहे. १९ व्या मजल्यावरून जीव वाचविण्यासाठी एक व्यक्तीने खाली उडी घेतली. मात्र, त्याचाही मृत्यू झाला. महापौर किशोर पेडणेकर (mayor kishori pednekar) सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.

आग विझविण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. ही हायफ्रोफाईल सोसायटी आहे. पण, त्यांची पाण्याची यंत्रणा सुरू नव्हती. याबाबत स्वतः सोसायटीचे सदस्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सोसायटीच्या व्यवस्थापनावर कारवाई व्हायला पाहिजे, असं महापौर म्हणाल्या.

अद्यापही दोन व्यक्ती इमारतीमध्ये अडकले -

इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर फर्निचरचे काम सुरू होते. तिथे ठिणगी उडून आगली. इमारतीमध्ये पूर्णपणे धूर पसरला असून परिस्थिती अत्यंत भीषण आहे. अजूनही इमारतीमध्ये दोन जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पाण्याचा स्त्रोत कुठे आहे? त्याचा आम्ही आधी माहिती घेतली. मात्र, येथील यंत्रणा बंद होती. अग्नीशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे अपयश म्हणता येणार नाही, असेही महापौर म्हणाल्या.

दरम्यान, घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या २० गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामध्ये सोसायटी व्यवस्थापनाची चूक आहे. त्याबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही महापौर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT