शिक्षक sakal
मुंबई

बेकायदा नियुक्त शिक्षकांवर कारवाई

शिक्षण विभागाची सेवा समाप्त नोटिस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काही संस्थाचालक व शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक भरती बंद असताना शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या केल्याचे आढळले आहे. याविरोधात आता शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार बेकायदा नियुक्ती मिळवलेल्या शिक्षकांवर व यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीसह सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात शालेय शिक्षण विभागाने २०१२ नंतर झालेल्या पटपडताळणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्‍याने शिक्षक भरती बंदी केली होती. तरीदेखील या काळात शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालकांनी संगनमत करून तब्बल चार हजार ११ शिक्षकांच्या बेकायदा नियुक्त्या केल्‍या. या शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कारवाई नुकतीच सुरू झाली असून नागपूर शिक्षण उपसंचालकांनी ५२ शिक्षकांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

याशिवाय या भरतीत भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यातील ४६ प्राथमि‍क आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यातील १३ प्राथमिकच्या आणि ३३ माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे तयार असून त्यावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

बेकायदा शिक्षक नियुक्तीप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे, त्यांचा सध्या बचाव केला जात आहे. शिवाय त्यांची आपल्या मर्जीप्रमाणे चांगल्या शहराच्या ठिकाणी बदली केली जात आहे. एकाच वेळी दोन -दोन ठिकाणचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला जात आहे. या सर्व बाबी गंभीर असून तातडीने याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे.

- नागो गाणार, शिक्षक आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT