मुंबई

गैरव्यवहार सिद्ध झाल्यास कारवाई; अजित पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) ताण असल्याने या यंत्रणेमार्फत परीक्षा घेणे शक्य नाही.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) ताण असल्याने या यंत्रणेमार्फत परीक्षा घेणे शक्य नाही.

मुंबई : आरोग्य खात्याच्या(medical department) ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे पोलिस तपासात उघड होऊन तसा अहवाल आल्यानंतर त्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी मंगळवारी दिली. मात्र, ज्या वर्गाच्या परीक्षेत गोंधळ झाला नाही, त्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

आरोग्य खाते, म्हाडा, टीईटी परीक्षांसह नोकरी भरतीच्या मुद्यावरून ठाकरे सरकाला घेरण्याची तयारी विरोधी भाजपने केली आहे. यानुषंगाने पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नोकर भरती आणि परीक्षांबाबत कोणाला पाठीशी घालणार नाही. मात्र, परीक्षांसाठी नेमलेल्या संस्था, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची माहिती घेऊन कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्याआधीच परीक्षांसाठी या संस्थांची नेमणूक झाली आहे, त्याचा माहिती गोळा करीत आहोत. तीन खासगी संस्थाच्या माध्यमातून परीक्षा होतील. त्याबाबत चर्चा झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) ताण असल्याने या यंत्रणेमार्फत परीक्षा घेणे शक्य नाही. स्वतंत्र परीक्षा मंडळाचा प्रयोग याआधी केला होता. त्यावरही सकारात्मक भूमिका घेता येईल, असे पवार म्हणाले.

कालावधी वाढविण्यावर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवास शक्य नसल्याने हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे, त्याला विरोधी पक्षांची होकार मिळाला आहे. मात्र, अधिवेशनाच्या आधी केवळ राजकारण करीत फुटकळ मुद्दे काढून विरोधक चहापानावरील बहिष्काराची परंपरा चालवत आहेत. ज्या विषयांना आधार नसतो, ते घेऊन सरकारविरोधात आरोप करण्याचा उद्योग विरोधकांकडे उरला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. ओमिक्रॉनचे संकट असल्याने अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला आहे. येत्या शुक्रवारी (ता.२४) कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन कालावधी वाढविण्यावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT