मुंबई

बेकायदा झोपड्यांवर कारवाई

सकाळवृत्तसेवा

वाशी - रबाळे एमआयडीसीतील सुलाईदेवी येथील बेकायदा झोपड्यांवर सोमवारी (ता. २५) एमआयडीसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ७२ झोपड्या जमीनदोस्त केल्या. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे माफिया हादरले आहेत. 

सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने आणि पोलिस, सरकारी आणि निमसरकारी अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात गुंतल्याने त्याचा गैरफायदा घेत माफियांनी झोपड्या बांधून त्या भाड्याने किंवा विकत देण्याचा सपाटा लावला आहे. एमआयडीसीच्या भूखंडावरही माफियांनी झोपड्या बांधून त्या गरजवंतांना विकून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. रबाळे एमआयडीसीतील सुलाईदेवी परिसरात एमआयडीसीच्या भूखंडावर झोपड्या बांधून मोक्‍याची जमीन गिळंकृत करण्याचा प्रकार सुरू होता. परंतु एमआयडीसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील ७२ झोपड्यांवर कारवाई करून हा भूखंड रिकामा केला. रबाळेतीलच प्लॉट पी-१६७ येथील १५ बेकायदा दुकानांवरही कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतीलच ओएस ११ येथील बेकायदा २० वर्कशॉपवर कारवाई करण्यात आली. यात पाच हजार चौरस फुटांचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. एमआयडीसीच्या या कारवाईमुळे बेकायदा झोपड्या बांधणाऱ्या आणि एमआयडीसीचा भूखंड गिळंकृत करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

एमआयडीसीच्या भूखंडावर अतिक्रमण केलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यात सुलाईदेवी येथील ७२ झोपड्या जमीनदोस्त केल्या असून एमआयडीसीच्या पाच हजार १०० चौरस मीटरचा भूखंड अतिक्रमणमुक्त केला. यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे.
- यशवंत मेश्राम, उप-अभियंता, एमआयडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT