fake doctors
fake doctors sakal media
मुंबई

बोगस फिजिओथेरपी डॉक्टर, संस्थांवर 'या' परिषदेचा कारवाईचा बडगा

संजीव भागवत

मुंबई : राज्यात विनापरवानगी कार्यरत असणाऱ्या बोगस फिजिओथेरपी डॉक्टर (Fake physiotherapy doctor) आणि बेकायदेशीररित्या अभ्यासक्रम चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या (Illegal education organization) मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषदेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. ( Action plan against Fake physiotherapy doctor and Illegal education organization-nss91)

राज्यात पदवी आणि नोंदणी न करता उपचार करणारे बोगस डॉक्टर आणि संस्था अशा तब्बल 32 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ सुदीप काळे यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली. राज्यात सरकारची परवानगी न घेता व परिषदेची मान्यता न घेता फिजिओथेरपी अभ्यासक्रम बेकायदेशीररीत्या चालवणार्‍या संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. तर दुसरीकडे फिजिओथेरपीची नोंदणी न करता बोगस पदवी घेऊन उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांची मोठी यादी परिषदेकडे उपलब्ध असून यावर कारवाई करण्यासाठी परिषदेने राज्यव्यापी मोहिमेला सुरुवात केली आहे. तीन टप्प्यात ही कारवाई केली जाणार असून सुमोर दीडशेहून अधिक जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मान्यता न घेता अभ्यासक्रम सुरू ठेवलेल्या आणि बोगस डॉक्टरांच्या अनेक तक्रारी परिषदेकडे मागील काही दिवसांपासून आल्या होत्या. त्यामुळे परिषदेकडून पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, सातारा, बुलढाणा, जळगाव आदी ठिकाणी धाडी टाकून तब्बल १४अनधिकृत शैक्षणिक संस्था आणि कार्यरत असलेल्या १८ अनधिकृत डॉक्टरांविरोधात नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत तर या सर्व जणांवर लवकरच मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहितीही डॉ. काळे यांनी दिली.

पदवी, मान्यता पाहूनच प्रवेश, उपचार घ्या...

फिजिओथेरपीवर उपचार घेताना प्रत्येक नागरिकांनी त्या डॉक्टरांची पदवी, त्यांनी त्या पदवीची परिषदेकडे नोंदणी केली आहे काय‍, हे तपासूनच उपचार घ्यावेत. शिवाय विद्यार्थ्यांनी एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेने सरकारची आणि परिषदेची मान्यता घेतली आहे काय, याची खातरजमा करूनच तेथे प्रवेश घ्यावेत, असे आवाहन डॉ. सुदीप काळे, यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT