मुंबई

ठाण्यातील बोगस डॉक्‍टरांवर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शहरातील बोगस डॉक्‍टरांविरुद्ध तक्रारी येत आहेत. जिल्हास्तरावरून बोगस डॉक्‍टरांच्या विरोधात वारंवार मोहीम आखली जात असते. पण त्यानंतरही शहरातील अनेक गल्लीबोळात बोगस डॉक्‍टर कार्यरत असल्याच्या तक्रारी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे आलेल्या आहेत. त्याची दखल घेऊन या बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. बोगस डॉक्‍टरांबाबतच्या वाढत्या तक्रारींबाबत आज महापौर म्हस्के यांनी महापौर दालनात तातडीची बैठक घेतली. 

ठाण्यामध्ये बहुतांश झोपडपट्टी विभाग असून या ठिकाणी राहणारी जनता आर्थिक दुर्बल घटकातील असते. येथील नागरिक किरकोळ आजारावर उपचार करण्यासाठी त्यांच्या विभागात असलेल्या डॉक्‍टरांकडे जातात; परंतु सदर डॉक्‍टर हे प्रशिक्षित आहेत की नाही, याबाबत त्यांना ज्ञान नसते. त्यामुळे रुग्णावर चुकीचे उपचार होत असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

काही वेळेला ते जीवावरही बेतते. त्यातच पालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्‍टरांच्या बेपर्वाईमुळे रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारचा रुग्ण दिव्यामध्येही डॉक्‍टरांच्या हलगर्जीने दगावल्याची माहिती महापौरांना देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांचा सर्व्हे करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश महापौरांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर यांना दिले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात दवाखाना सुरू करावयाचा असल्यास महापालिकेच्या संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील विशिष्ट झोपडपट्टी विभागातील सर्व दवाखान्यांची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून समिती गठीत करण्यात यावी, असे आदेश महापौरांनी दिले आहे. 

महापौरांच्या सूचना 
बोगस डॉक्‍टरांविरोधातील समिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक राजेंद्र अहिवर यांच्या अध्यक्षतेखाली नेमावी. यात वैद्यकीय अधिकारी, पोलिस उपायुक्त, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता, विधी सल्लागार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी असतील, असेही महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत ठरविण्यात आले. बोगस डॉक्‍टरांमुळे जर नागरिकांचे जीव जाणार असतील तर ते कदापि सहन करणार नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने पावले उचलून समिती नेमून कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

FDA Action: 'सुलेमान मिठाईवाला'वर बडगा! मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने एफडीएकडून निलंबित

Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

SCROLL FOR NEXT