actor annu kapoor loses 4-36 lakh from bank account in online scam here is what happened mumbai sakal
मुंबई

Annu Kapoor : अभिनेते अनु कपूरची ऑनलाईन फसवणूक..

लाखोंना ऑनलाईन गंडा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अनु कपूर यांच्यासोबत ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपये लंपास केले आहेत. अनु कपूर यांनी यासंदर्भात माहिती ओशिवरा पोलिसांना दिली आहे. अनु कपूर याना एका खाजगी बँकेतून कॉल आला, जिथे त्यांना लिंक केलेले खात्याशी केवायसी अपडेट करण्यास सांगण्यात आले. त्याच दरम्यान त्यांच्या खात्यातून 4.36 लाख रुपये ऑनलाईन लंपास करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी अनु कपूर याचा जवाब नोंदवून तपास सुरू केला आहे.

अभिनेत्याची फसवणूक

अनु कपूर यांना बँकेतील एका कर्मचाऱ्याचा गुरुवारी 27 सप्टेंबर रोजी फोन आला होता. बँक कर्मचार्‍याने अनु कपूर यांना केवायसी फॉर्म अपडेट करावा लागेल असे सांगितले. यानंतर अनु कपूर यांनी बँकेचे तपशील त्याच्यासोबत शेअर केले. यासोबतच अनु कपूरने त्याच्यासोबत ओटीपी (वन टाईम पासवर्ड) शेअर केला. त्यानंतर कपूर यांच्या बँक खात्यातून 4.36 लाख रुपये कापले गेले. अनु कपूर यांच्या दोन खात्यांमधून ही रक्कम दोनदा काढली गेली . फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनु कपूरने वेळ न घालवता ओशिवरा पोलिसांना माहिती दिली तसेच खाते गोठवण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. अखेरीस बँकेने अनु कपूर यांची दोन्ही खाती गोठवली आहेत. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन फसवणुकीबाबत पोलीस तपास करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT