Bollywood Actor Govinda Net Worth  
मुंबई

Govinda Net Worth : २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर खासदार... 'राजा बाबू'ची पुन्हा राजकरणात एन्ट्री! जाणून घ्या नेटवर्थ

Bollywood Actor Govinda Net Worth : देशभरात सध्या चर्चा आहे ती लोकसभा निवडणुक २०२४ संबंधीची, यादरम्यान राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

रोहित कणसे

Bollywood Actor Govinda Net Worth : देशभरात सध्या चर्चा आहे ती लोकसभा निवडणुक २०२४ संबंधीची, यादरम्यान राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान बॉलिवुड अभिनेते गोविंदा यांनी पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री केली आहे.

२००४ साली त्यांनी कांग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती इतकंच नाही तर ही निवडणूक जिंकून ते खासदार देखील बनले होते. आता दब्बल दोन दशकांनंतर त्यांनी पुन्हा राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार गोविंदा आथा शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.

गोविंदाची संपत्ती किती आहे?

बॉलिवुड अभिनेता गोविंदा अनेक वर्षांनंतर राजकारणात दाखल होणार असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर २०२४ लोकसभेची निवडणुक ते शिवसेनेकडून लढणार असल्याचे बोलले जात आहे. राजकारणापासून अनेक वर्ष दूर राहिलेल्या गोविंदा यांची सपत्ती कोट्यवधींमध्ये आहे. Myneta.info या वेबसाइटवरनुसार २००४ साली सादर केलेल्या २००४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली नेट वर्थ १४ कोटी असल्याचे जाहीर केली होते. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता २० वर्षांनंतर त्यांची एकूण संपत्ती १८ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल १५० कोटींच्या आसपास आहे. २००४ साली गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

चित्रपट क्षेत्रात स्वतःची खास ओळख असलेले गोविंदा यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत अभिनय असला तरी ते ब्रँड एंडोर्समेंट्सच्या माध्यामातून देखील भरपूर पैसे कमावतात. या सर्व स्त्रोतांपासून त्यांची वार्षीक कमाई १२ कोटी रुपये असून दर महिना ते जवळपास १ कोटी रुपये कमाई करतात. गोविंदा यांच्याकडे दोन घरे देखील आहेत. मुंबईत जुहूच्या रुईया प्राक मध्ये एक आणि दुसरे मडआयलंड येथे आहे. या घरांची अंदाजीत किंमत सुमारे १६ कोटी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्यांनी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक देखील केलेली आहे.

एका चित्रपटासाठी किती पैसे घेतात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा एक चित्रपट करण्यासाठी ५ ते ६ कोटी रुपये आकरतात. तर एक ब्रँड एंडोर्स करण्यासाठी ते तब्बल २ कोटी रुपये चार्ज करतात. त्यांची लग्झरी लाइफस्टाइल त्यांच्या कार कलेक्शनमधून देखील दिसून येते. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार्स आहेत. ज्यामध्ये Mitsubishi Lancer, Ford Endeavor सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT