मुंबई

अभिनेते कुशल बद्रिकेंच्या व्हिडिओची आमदार प्रताप सरनाईकांकडून दखल; घोडबंदर रस्त्यावर होणार सुरक्षेचे उपाय

राजेश मोरे


ठाणे ः घोडबंदर रस्त्यावरील वाघबीळ येथील उड्डाणपुलानजीक धोक्याचा इशारा देणारे कुठलेही फलक नसल्याने येथे दररोज अपघात होत आहेत. याबाबत येथील रहिवासी आणि 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते कुशल बद्रिके यांनी ही समस्या मांडली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी याची दखल घेतली असून येत्या 10 दिवसात वाघबीळ येथील तसेच इतर 3 अशा चारही उड्डाणपुलांवर सुरक्षेचे उपाय केले जाणार आहेत.  

अभिनेते कुशल बद्रिके हे ठाण्यात वाघबीळ परिसरात राहतात. बद्रिके यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत 'येथे जो उड्डाणपूल आहे तो रस्त्यापासून वेगळा आहे. येथे पुलावर चढताना , उतरताना अंधारात काहीच दिसत नाही. तिथे कोणताही फलकही नाही किंवा एखादा लाईट नाही. त्यामुळे येथे रोज अपघात होतात, याबाबत उपाययोजना कराव्यात' अशी विनंती केली होती.

बद्रिके यांचा हा व्हिडिओ पाहताच आमदार प्रताप सरनाईक यांनी बद्रिके यांच्याशी चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेतली.  त्यानंतर  सरनाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी लगेच चर्चा केली.

रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले, ठाणे महापालिकेच्या दिवाबत्ती विभागाचे अभियंता विनोद गुप्ता यांच्याशी आमदारांनी तात्काळ चर्चा केली. अंधारात रात्रीच्या वेळेस उड्डाणपुलाचा कठडा दिसत नसल्याने अपघात होतात, ही बाब गंभीर असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे असे सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT