pallavi joshi
pallavi joshi 
मुंबई

अभिनेत्री मुंबईत, क्रेडिट कार्डवरून चोरी युरोपात

अनिश पाटील

मुंबई: चित्रपट व टीव्ही अभिनेत्री पल्लवी जोशी यांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डचा डेटा चोरून आरोपींनी युरोपात त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

अंधेरी सात बंगला परिसरात राहणाऱ्या जोशी यांच्या क्रेडिट कार्डाचा वापर परदेशात करण्यात आला असून त्या वेळी कार्ड जोशी यांच्याकडेच होते. नेहमीप्रमाणे त्या कार्यालयात बसल्या असताना त्यांच्या मोबाईलवर पाच ते सहा संदेश आले. त्यात क्रेडिट कार्डमधील व्यवहार युरोमध्ये (युरोपियन चलन) झाले होते. त्या वेळी त्यांनी तत्काळ बॅंकेला याची माहिती देऊन क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले, पण तोपर्यंत जोशी यांच्या क्रेडिट कार्डवरून १२ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले होते. याप्रकरणी प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी क्रेडिट कार्डचा वापर करून युरोपमध्ये उबर प्रवासाचा खर्च भरला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणामध्ये असे झाले नाही. याबाबत तक्रारदार अभिनेत्रीला विचारले असता त्यांना असा कोणताही संदेश अथवा दूरध्वनी बॅंकेकडून आला नाही. त्यांनी स्वतः दूरध्वनी करून बॅंकेला याबाबतची माहिती दिली, असे पोलिस 
अधिकाऱ्याने सांगितले.

चोरीत आंतरराष्ट्रीय टोळीचा हात?
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय सायबर आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे. हा व्यवहार कोणी केला व त्याचा फायदा कोणाला झाला या व्यवहारांबाबतची माहिती बॅंकेकडे मागितली असून ती मिळाल्यानंतर नेमकी माहिती देता येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

SCROLL FOR NEXT